1.धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य-७ जुलै २०१३ ,2.पुणे विद्यापीठ-१३ जुलै २०१३,3.महाराष्ट्र शासन कृषी विभाग-10 जुलै २०१३ ,4.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-११ जुलै २०१३,5.जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव -20जुलै २०१३
Loading...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ! - सुरेश भट.

सामान्य ज्ञान


महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी...
मुख्यमंत्री
खाती
पृथ्वीराजदाजीसाहेबचव्हाणनगरविकासगृहनिर्माणसामान्यप्रशासनमाहिती व जनसंपर्कगलिच्छ वस्ती सुधारणाघरदुरुस्ती व पुनर्बांधणीनागरी कमाल जमीन धारणापरिवहनखनिकर्ममराठी भाषाविधी व न्यायमाजी सैनिकांचेकल्याण व अन्य कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विषय

उपमुख्यमंत्री
खाती                                                                  
अजित पवारअर्थ  नियोजनऊर्जा


कॅबिनेट मंत्री
खाती
नारायण राणे  उद्योगबंदरेरोजगार व स्वयंरोजगार
आर. आर. पाटीलगृह
छगन भुजबळ    सार्वजनिक बांधकामपर्यटन
पतंगराव कदमवनेमदत व पुनर्वसनभूकंप पुनर्वसन
शिवाजीराव मोघे   सामाजिक न्यायविमुक्त भटक्या जमाती व अन्य मागासवर्गीय कल्याण,व्यसनमुक्ती कार्ये
राधाकृष्ण विखे-पाटील  कृषी आणि पणन
जयंत पाटील  ग्रामीण विकास
हर्षवर्धन पाटील   सहकारविधिमंडळ कामकाज
गणेश नाईक    उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा
बाळासाहेब थोरात  महसूलखारजमीन
लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा  स्वच्छता
जयदत्त क्षीरसागर  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
मनोहरराव नाईक  अन्न  औषध प्रशासन
डॉ. विजयकुमार गावित  वैद्यकीय शिक्षणफलोत्पादन
सुनील तटकरेजलसंपदा (कृष्णा खोरे वगळून)
रामराजे नाईक-निंबाळकर  जलसंपदा (कृष्णा खोरे)
बबनराव पाचपुते आदिवासी विकास
राजेश टोपे   उच्च  तंत्रशिक्षण
राजेंद्र दर्डा शालेय शिक्षण
नसीम खान  वस्त्रोद्योगअल्पसंख्याक कल्याण आणि औकाफ
सुरेश शेट्टीसार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणराजशिष्टाचार
हसन मुश्रीफ  कामगार आणि विशेष सहाय्य
नितीन राऊत  रोजगार हमी योजनाजलसंधारण
मधुकर चव्हाण पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय
पद्माकर वळवीक्रीडा व युवक कल्याण, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य
वर्षा गायकवाडमहिला व बालकल्याण 

राज्यमंत्री
खाती
रणजीतकांबळे पाणीपुरवठा आणि स्वच्छताअन्न आणि नागरी पुरवठाग्राहक संरक्षणपर्यटनसार्वजनिकबांधकाम
भास्करजाधवनगरविकासवनेबंदरेखारजमीनसंसदीय कार्यक्रीडा व युवक कल्याणमाजी सैनिकांचे कल्याणविधी व न्याय
प्रकाशसोळंकेमहसूलमदत व पुनर्वसनभूकंप पुनर्वसनसहकारपणनवस्त्रोद्योग
सचिनअहिरगृहनिर्माणगलिच्छ वस्ती सुधारणाघरदुरुस्ती व पुनर्बांधणीनागरी कमाल जमीन धारणा,उद्योगखनिकर्मसामाजिक न्यायपर्यावरणविमुक्त भटक्या जाती व अन्य मागासवर्गीयांचे कल्याणव्यसनमुक्ती कार्य
फौजियाखानसामान्य प्रशासन विभागमाहिती व जनसंपर्कसांस्कृतिक कार्यराजशिष्टाचारशालेय शिक्षण,महिला व बालविकाससार्वजनिक आरोग्यकुटुंब कल्याण आणि अल्पसंख्याक विकास (औकाफसह)
गुलाबरावदेवकरकृषीपदुमजलसंधारणरोजगार व स्वयंरोजगारपरिवहन
सतेजपाटीलगृह (शहरे व ग्रामीण)ग्रामविकासअन्न व औषध प्रशासन
राजेंद्रमुळकअर्थ व नियोजनऊर्जाजलसंपदाविधिमंडळ कामकाजउत्पादनशुल्क
राजेंद्र गावितआदिवासी विकासकामगारपाणलोट क्षेत्र विकासफलोत्पादन
डी पीसावंतवैद्यकीय शिक्षणउच्च आणि तंत्रशिक्षणविशेष सहाय्यअपारंपरिक ऊर्जा

--------------------------------------------------------------------
‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा.. 


बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ - 
                     या काव्यपंक्तीनी १ में या दिवसाची सुरुवात होते . शाळेत असताना १ मे हा दिवस उन्हाळी सु्ट्टीतला  एक दिवस म्हणून जास्त महत्वाचा वाटत नसे. पण आज सुज्ञ नागरिक म्हणून असे बेजवाबदार विचारसुद्धा करता येणार नाही.

महाराष्ट्र या नावातच सारं काही आलं!
अनेक वीरपुरुषांचे ,बुध्दिमान व्यक्तींचे , १०५ हुतात्म्यानी  आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले राज्य .
इतिहास, भूगोल ,कला ,क्रीडा ,साहित्य ,राजकारण ,निसर्ग विविधतेने नटलेला ,  हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा असलेला महाराष्ट्र  

महाराष्ट्र राज्याची निर्मिती

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरु आहेत. 

नावाचा उगम
 महाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास 
 1. क्षेत्रफळ    ३०७,७१३ km² (११८,८०९ sq mi)[१]
 2. राजधानी    मुंबई
 3. मोठे शहर    मुंबई
 4. जिल्हे    ३५
 5. लोकसंख्या
 6. घनता    ९६,७५२,२४७ (२रा) (२००१)
 7. ३१४.४२/km² (८१४/sq mi)


भाषा    मराठी
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. 

इतिहास
 पहिले शेतकरी
मध्यपाषाण कालीन ४००० इस पुर्व धान्याची लागवड तापी नदीच्या खोर्‍यात सुरु झाले. जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमः सापडले जे १५०० इ.पु. चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावाहुन करण्यात आले आहे. त्यात मुख्यतः रंगवलेले भांडी व तांब्यापासुन बनवलेले भांडी आणि शस्त्रे सापडली. येथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली आहे. ते विविध पिके पिकवत होते. येथील घरे मोठे चौकोनी, चट्टे व माती पासुन बनवलेली असत. धान्य कोठारांत व कनगीत साठवलेली आढळते. स्वयंपाक दोन कोन्याच्या चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.

 मौर्य ते यादव
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

 मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

 सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचूरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालूक्य आणि कल्याणी चालूक्यांचा काळ
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

 राष्ट्रकुटाचा काळ
दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.

यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

अजिंठ्यातील लेणी

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.

त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.


मराठा व पेशवे
छत्रपती शिवाजी महाराज

१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.

शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.


ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.

महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
हुतात्मा स्मारक,मुंबई


ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.


भौगोलिक स्थान

महाराष्ट्रातील पर्वत
कोकण

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.


प्रशासन
मंत्रालय:महाराष्ट्र राज्य

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.

महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २००६)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असली तरी सर्वांत मोठा पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस हा आहे. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री तर छगन भुजबळ हे उप-मुख्यमंत्री आहेत.


विभाग
महाराष्ट्र राज्याचे विभाग

महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.

भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग).महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती....

*जिल्हे- ३५, *तालुके- ३५८,,*पंचायत समिति- ३४९, *जिल्हा परिषद- ३३

* महानगर पालिका - २३, *नगर परिषदा-२२३, *कटक मंडल-७, *खेडी-२८७५४, नगर पंचायती-३

* महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफलाने - अहमदनगर

* महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रपलाने - मुंबई

* मुंबई जिल्हयामधे एकही तालुका, ग्राम पंचायात नाही।

* महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारा जिल्हा- मुंबई. 


>>राज्यातील प्रमुख शिखरे <<
 1. कळसूबाई - १,६४६ मी.
 2. साल्हेर - १,५६७ मी.
 3. महाबळेश्र्वर -१,४३८ मी.
 4. हरिश्चंद्रगड -१,४२४ मी 

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
 1. त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
 2. घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
 3. भीमाशंकर- जिल्हा पुणे
 4. परळी वैजनाथ- जिल्हा बीड
 5. औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.
कवी/साहित्यिक टोपण नावे
 1. कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
 2. गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
 3. त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
 4. प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
 5. राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
 6. विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
 7. निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
 8. माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
 9. चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
 10. आत्माराम रावजी देशपांडे - अनिल


 • भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के), तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
 •  महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.
 •  महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.
 •  महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
 •  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
 •  महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
 •  महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.
 •  महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.
 •  महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
 •  महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
 •  प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).
 •  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता
 •  महाराष्ट्र राज्याचा  वृक्ष- आंबा,
 •  महाराष्ट्र राज्याचा  राज्य प्राणी- शेकरू, 
 •  महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन,
 •  महाराष्ट्र राज्याचा  राज्य पक्षी- हरावत, 
 •  महाराष्ट्र राज्याचा राज्य भाषा- मराठी.
 • महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.


 •  भारताचे प्रवेशद्वार- मुंबई 
 •  भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.
 •  महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर 
 •  महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
 •  महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
 •  मुंबईची परसबाग - नाशिक
 •  महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
 •  मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
 •  द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
 •  आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
 •  महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
 •  महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
 •  संत्र्याचा जिल्हा- नागपूर
 •  महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
 •  जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
 •  महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
 •  साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
 •  महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
 •  महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
 •  कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
 •  लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते 

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :

 1. विद्यापीठ/स्थापना                                                            ठिकाण/स्थान
 2. मुंबई विद्यापीठ (१८५७)                                                     - मुंबई
 3. पुणे विद्यापीठ (१९४९)                                                        - पुणे
 4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर                                  - नागपूर
 5. विद्यापीठ (१९२५)
 6. कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती                               - अमरावती
 7. विद्यापीठ (१९८३)
 8. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर                                  - औरंगाबाद
 9. मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
 10. शिवाजी विद्यापीठ (१९६३)                                                - कोल्हापूर
 11. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८)                      - नाशिक
 12. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८)                     - नाशिक
 13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान                                    - लोणेरे (रायगड)
 14. विद्यापीठ (१९८९) 
 15. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९)                                       - जळगाव
 16. कविकुलगुरू कालिदास संस्कृत                                       - रामटेक (नागपूर)
 17. विद्यापीठ (१९९८)
 18. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४)          - नांदेड
 19. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००)             - नागपूर
 महाराष्ट्रातील अष्टविनायक

अष्टविनायक

   श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक! अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.
श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

मोरगांव
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

थेऊर

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.
पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)

सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

रांजणगाव

अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

लेण्याद्री

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

महड

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.

पाली

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे - ( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.) १. टेकडीचा गणपती(नागपूर) - जि. नागपूर
२. शमी विघ्नेश(अदासा) - जि. नागपूर
३. अष्टदशभूज(रामटेक) - जि. नागपूर
४. भृशुंड(मेंढा) - जि. भंडारा
५. सर्वतोभद्र(पवनी) - जि. भंडारा
६. सिद्धीविनायक(केळझर) - जि. वर्धा
७. चिंतामणी(कळंब) - जि. यवतमाळ
८. वरदविनायक(भद्रावती) - जि. चंद्रपूर
भारतातील सर्वात पहिली महिला :


* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू
* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
* पंतप्रधान- इंदिरा गांधी
* महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित
* मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी
* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल
* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान
* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा
* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित
* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी
* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी
* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)
* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख. 
भारतरत्‍न

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. नुकतेच,भारतरत्न पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.अतुलनीय कामगिरी बजावणार्‍या लोकांनाही आता या पुरस्काराने सन्मानितकरता येऊ शकते.यातील निवडक श्रेणीला भारतरत्न देण्याची अट काढुन टाकण्यात आली आहे. तशी अधिसूचना व रजपत्र जारी करण्यात आले आहे.


२ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.

पुरस्काराचे स्वरूप

सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसर्‍या बाजूस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले. सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसर्‍या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे. हा पुरस्कार मिळवणार्‍यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये स्थान मिळते.

सन्मानित व्यक्तींची यादी

नाववर्ष
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)१९५४
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२)१९५४
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०)१९५४
डॉ. भगवान दास (१८६९-१९५८)१९५५
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२)१९५५
जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४)१९५५
गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१)१९५७
डॉ. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२)१९५८
डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२)१९६१
पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२)१९६१
डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)१९६२
डॉ. झाकिर हुसेन(१८९७-१९६९)१९६३
डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२)१९६३
लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६)१९६६
इंदिरा गांधी (१९१७-१९८४)१९७१
वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०)१९७५
के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५)१९७६
मदर तेरेसा (१९१०-१९९७)१९८०
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२)१९८३
खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८)१९८७
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७)१९८८
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६)१९९०
नेल्सन मंडेला (जन्म १९१८)१९९०
राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१)१९९१
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०)१९९१
मोरारजी देसाई (१८९६-१९९५)१९९१
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८)१९९२
जे. आर. डी. टाटा (१९०४-१९९३)१९९२
सत्यजित रे (१९२२-१९९२)१९९२
सुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) (नंतर परत घेतले)१९९२
ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१)१९९७
गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८)१९९७
अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)(१९०६-१९९५)१९९७
एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४)१९९८
चिदंबरम् सुब्रमण्यम् (१९१०-२०००)१९९८
जयप्रकाश नारायण (१९०२-१९७९)१९९८
रवी शंकर (जन्म १९२०)१९९९
अमर्त्य सेन (जन्म १९३३)१९९९
गोपीनाथ बोरदोलोई‎ (जन्म १९२७)१९९९
लता मंगेशकर (जन्म १९२९)२००१
बिसमिल्ला खान (१९१६-२००६)२००१
भीमसेन जोशी (१९२२-२०११)२००८

 
भारतीय पंतप्रधान

अक्रनावकार्यकालपक्ष
पंडित जवाहरलाल नेहरूऑगस्ट १५,१९४७ - मे २७,१९६४कॉँग्रेस
गुलजारी लाल नंदामे २७,१९६४ - जुन ९, १९६४कॉँग्रेस
लाल बहादूर शास्त्रीजुन ९, १९६४ - जानेवारी ११,१९६६कॉँग्रेस
गुलजारी लाल नंदाजानेवारी ११,१९६६ - जानेवारी २४,१९६६कॉँग्रेस
इंदिरा गांधीजानेवारी २४,१९६६ - मार्च २४,१९७७कॉँग्रेस
मोरारजी देसाईमार्च २४,१९७७ - जुलै २८,१९७९जनता पक्ष
चौधरी चरण सिंहजुलै २८,१९७९ - जानेवारी १४,१९८०जनता पक्ष
इंदिरा गांधीजानेवारी १४,१९८० - ऑक्टोबर ३१,१९८४कॉँग्रेस(आय)
राजीव गांधीऑक्टोबर ३१,१९८४ - डिसेंबर २, १९८९कॉँग्रेस(आय)
१०विश्वनाथ प्रताप सिंगडिसेंबर २, १९८९ - नोव्हेंबर १०, १९९०जनता दल
११चंद्र शेखरनोव्हेंबर १०, १९९० - जुन २१, १९९१जनता दल (स)
१२पी. वी. नरसिंहरावजुन २१, १९९१ - मे १६, १९९६कॉँग्रेस(आय)
१३अटलबिहारी वाजपेयीमे १६, १९९६ - जुन १, १९९६भारतीय जनता पक्ष
१४एच. डी. देवेगौडाजुन १, १९९६ - एप्रिल २१, १९९७जनता दल
१५इंदर कुमार गुजरालएप्रिल २१, १९९७ - मार्च १९, १९९८जनता दल
१६अटलबिहारी वाजपेयीमार्च १९, १९९८ - मे २२, २००४भारतीय जनता पक्ष
१७डॉ. मनमोहन सिंगमे २२, २००४ - आजभारतीय राष्ट्रीय कॉँग्रे

                                                              

समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर    
 1. बहिष्कृत हितकारणी सभा, 
 2. पीपल्स एज्युकेशन सोसायटी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन, 
 3. रिपब्लिकन पार्टी, 
 4. भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस
डॉ. आत्माराम पांडुरंग     
 1. प्रार्थना समाज
महात्मा फुले 
 1. सत्यशोधक समाज
गोपाळ कृष्ण गोखल      
 1. भारत सेवक समाज
नाना शंकरशेठ        
 1. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, 
 2. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट
दादोबा पांडुरंग     
 1. परमहंस सभा, 
 2. मानवधर्म सभा (सुरत)
डॉ. भाऊ दाजी लाड            
 1. बॉम्बे असोसिएशन
महर्षी कर्वे    
 1. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, 
 2. महिला विद्यापीठ, 
 3. विधवा विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच, 
 4. अनाथ बालिकाश्रम मंडळी,
 5. निष्काम कर्ममठ
कर्मवीर भाऊराव पाटील           
 1. रयत शिक्षण संस्था,
 2. दुधगांव विद्यार्थी आश्रम
ग. वा. जोशी     
 1. सार्वजनिक सभा (पुणे)
स्वा. सावरकर     
 1. मित्रमेळा, 
 2. अभिनव भारत.
विठ्ठल रामजी शिंदे    
 1. राष्ट्रीय मराठा संघ,
 2. डिप्रेस्ठ क्लास मिशन    
न्या. रानडे                    
 1. सामाजिक परिषद, 
 2. डेक्कन सभा

पंडिता रमाबाई             
 1. शारदा  सदन, 
 2. मुक्ती सदन,
 3. आर्य महिला समाज
रमाबाई रानडे                     
 1. सेवासदन (पुणे व मुंबई)
सरस्वतीबाई जोशी              
 1. स्त्री विचारवंती संस्था (पुणे)
डॉ. पंजाबराव देशमुख       
 1. श्री. शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती), 
 2. श्रद्धानंद छात्रालय, 
 3. भारत कृषक समाज
संत गाडगेबाबा        
 1. पंढरपूर, नाशिक, देहू, मुंबई येथे धर्मशाळा, 
 2. गौरक्षण संस्था 
 3. (मूर्तिजापूर) पूर्णा नदीवर श्रमदानातून स्वत: घाट बांधला
 4. अंध-पंगू सदावर्त ट्रस्ट (नाशिक)
बाबा आमटे            
 1. आनंदवन (चंद्रपूर) 
 2. अशोकवन (नागपूर)
डॉ. बाबा आढाव                  
 1. हमाल भवन
हमीद दलवाई                   
 1. मुस्लिम सत्यशोधक समाज
डॉ. केशव हेडगेवार           
 1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  
भारतातील प्रसिद्ध जनक व प्रणेते 


* भारताचे राष्ट्रपिता                                                          - महात्मा गांधी
* आधुनिक भारताचे जनक                                              - राजा राम मोहन रॉय
* भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक                                    - ए. ओ. ह्य़ूम
* भारतीय असंतोषाचे जनक                                            - लोकमान्य टिळक
* भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक                 - लॉर्ड रिपन
*  भारतीय राज्यघटनेचे जनक                                        - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते                                         - डॉ. एम. एस. स्वामीनाथन
* भारतीय उद्योगधंद्याचे जनक                                         - सर जमशेदजी टाटा
* आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक                          - दादाभाई नौरोजी
* भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक                                       - दादासाहेब फाळके
* भारतीय धवल क्रांतीचे जनक                                        - डॉ. वर्गीस कुरीयन
* परमसंगणकाचे जनक                                                   - डॉ. विजय भटकर
* भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक              - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
* भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार                - राजा रामण्णा
* नवीन उदारमतवादी आर्थिक धोरणाचे शिल्पकार        - डॉ. मनमोहन सिंग
* भारताच्या ‘चांद्रयान- १’ या प्रकल्पाचे जनक                - अण्णा दुराई.
* मार्क्‍सवादी कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते                      - ज्योती बासू


भारतातील थोर व्यक्तींचे नारे 
* पंडित नेहरू                                        - आराम हराम है
* महात्मा गांधी                                   - करा किंवा मरा, भारत छोडो, चले जाव
* लोकमान्य टिळक                            - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच
* लालबहादूर शास्त्री                            - जय जवान, जय किसान
* सुभाषचंद्र बोस                                  - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, जयहिंद
* भगतसिंह                                          - इन्कलाब झिंदाबाद
* इंदिरा गांधी                                       - गरिबी हटाओ
* राजीव गांधी                                      - मेरा भारत महान
* रवींद्रनाथ टागोर                                - जन-गण-मन अधिनायक जय हे
* बंकीमचंद्र चॅटर्जी                                - वंदे मातरम्
* महंमद इक्बाल                                  -  सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा
* रामप्रसाद बिस्मिल                           -  सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैशास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :-
अ‍ॅनिमोमीटर                                     - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
ऑडिओमीटर                                     - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
बॅरोमीटर                                           - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
बॅरोग्राफ                                            - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
मायक्रोस्कोप                                    - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
लॅक्टोमीटर                                       -दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
स्फिग्मोमॅनोमीटर                           - रक्तदाब मोजण्याचे साधन.

स्टेथोस्कोप                                        -हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
सेस्मोग्राफ                                        -भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
फोटोमीटर                                        -परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
हायग्रोमीटर                                      - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
हायड्रोमीटर                                      
- द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
हायड्रोफोन                                         - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
अ‍ॅमीटर                                              -विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
अल्टीमीटर                                        - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.